सेतू सुविधा केंद्राबाबत रावेर तालुक्यात अनागोंदी

जळगाव : रावेर तालुक्यातील चिनावल या गावातील सेतू सुविधा केंद्राबाबत गावक-यांची मोठ्या प्रमाणात ओरड सुरु आहे. चिनावल परिसरातील पोलिस पाटील या सेतू सुविधा केंद्राचा चालक असल्याचे समजते. या सेतु सुविधा केंद्राच्या मनमानी कारभारास गावकरी मोठ्या प्रमाणात वैतागले असून हे  केंद्र बंद करावे अशी एकमुखी मागणी परिसरातून जोर धरत आहे. या सुविधा केंद्राच्या मनमानी कारभारामुळे चिनावल परिसरातील गावकरी व विद्यार्थ्यांना विविध दाखले काढण्यासाठी शहरी भागात जावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाने महा ई सेवा केंद्र गावोगावी सुरु केले. “शासन आपल्या दारी” या उद्देशाने सामान्य जनतेचा त्रास कमी होण्यासाठी या ई – सेवेची सुरुवात करण्यात आली होती. मात्र एकाच गावात एक सोडून तिन तिन सेवा केंद्र व त्यात देखील अनागोंदी कारभार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. काही काही भागात सदर ई सेवा केंद्र आहेत किंवा नाही याची देखील नागरिकांना खबरबात नसल्याचे दिसून येत आहे.

गोरगरीब नागरिक, महिला, अपंग व्यक्ती, शाळकरी मुले यांना गावातच सर्व प्रकारचे शैक्षणीक व इतर दाखले उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे या अनागोंदी कारभारामुळे दिसून येत आहे. डिस्स्ट्रीक्ट मँनेजर यांच्याशी लागेबांधे असल्यामुळे काही केंद्र चालकांना सदर केंद्र चालवण्याची परवानगी मिळाली असल्याचे म्हटले जात आहे. या कारभाराला लगाम कोण घालणार? असे लोक आता उघडपणे बोलत आहेत.

रावेर तालुक्यातील चिनावलसह परिसरातील ब-याच गावक-यांना आपल्या गावात सेतू सुविधा केंद्र आहे किंवा नाही हे देखील माहीत नाही. रावेर तालुक्यातील चिनावल येथील सेतू केंद्र चालक पोलीस पाटील यांच्या कारभाराला जिल्हा सिएससी मॅनेजर यांचा आशिर्वाद असल्याचे म्हटले जात आहे. पोलिस पाटील तथा सेतू केंद्रचालकाच्या मनमानी कारभारामुळे परिसरातीला आदिवासी जनता व गावक-यांना वेळेवर विविध प्रकारचे दाखले, पँन कार्ड, जीवन आरोग्य कार्ड, उत्पन्नाचे दाखले, 7/12 उतारे मिळत नसल्यामुळे ते या सुविधेपासून वंचीत आहे.

रावेर तालुक्यातील चिनावल या गावात एक महा ई सेवा केंद्र ,आपले सरकार सेवा केंद्र VLE, CSC, असे महाराष्ट्र शासन व भारत सरकार मान्यतेचे सेतू सेवा केंद्र देण्यात आले आहे. हे सेतू सेवा केंद्र शासन आपल्या दारी या योजनेच्या अंतर्गत सुरु झाले. त्या काळात संबधित जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी संबधित जिल्हा डिस्ट्रिक्ट मँनेजर यांच्या परिचयातील लोकांना केंद्र चालवण्याची परवानगी देवून हा कार्यक्रम पार पडला.

नंतर याकामी हलगर्जीपणा सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. हे डिस्ट्रीक्ट मँनेजर गावोगावी भेटी देवून तपासणी न करता केवळ मोबाईलच्या माध्यमातून विचारणा करुन कारभार करत असल्याचे म्हटले जात आहे.

शासनाने महा ई सेवा केंद्र गावोगावी सुरु केली खरी मात्र त्याची पुरेपुर सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहचली नसल्याचे दिसून येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र काय आहे? याची माहिती अजुनदेखील ब-याच लोकांना माहिती नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here