जे.के.पार्क परिसरात झन्ना मन्ना जुगारावर छापा

जळगाव : मेहरुण – जे.के.पार्क परिसरात सुरु असलेल्या झन्ना मन्ना फटकी जुगार खेळणा-या सहा जणांवर आज दुपारी कारवाई करण्यात आली. सदर कारवाई सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता याच्या पथकाने केली.

पोलिस अधिक्षक कार्यालयातील वाचक पोलिस उप निरिक्षक सुनिल पाटील यांच्यासह हवालदार राजेश प्रभाकर चौधरी, विजय काळे यांच्यासह आरसीपी प्लाटूनचे दहा कर्मचारी व पंचासमक्ष सदर कारवाई करण्यात आली. या कारवाईत मेहरुण – जे.के.पार्क परिसरातील काटेरी झुडूपात झन्ना मन्ना फटकी जुगार खेळणा-या जमावावर छापा घालण्यात आला. यावेळी काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान हाती आलेल्या दिपक काशिनाथ भोई (40) आव्हाणे ता.जि. जळगाव, रमेश जगन्नाथ पाटील (58) आव्हाणे ता.जळगांव, अनीस हमीद शेख (27) फुकटपुरा मेहरुण तांबापुरा जळगाव, भगवान सुकदेव पवार(44), शिरसोली प्र.बो.ता.जळगांव, अनिल श्रावण पाटील (48) पाटील वाडा मेहरुण जळगांव, हेमंत अनिल पाटील(17) पाटील वाडा मेहरुण जळगांव यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी पो.कॉ. रविंद्र सुकदेव मोतीराया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल करण्यात आला. या कारवाईत रोख रुपये 41670, सहा मोबाईल, चार मोटारसायकल, जुगाराची साधने असा एकुण 254670 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here