हातभट्टी व देशी दारुची बेकायदा विक्री – एकास अटक

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : जळगाव शहरातून कानळदा या गावाकडे जाणा-या रस्त्यावर बेकायदा हातभट्टी व देशी दारु विक्री करणा-या एकास पोलिस उप अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने आज अटक केली आहे.

कानळदा रस्त्यावरील के.सी. पार्क नजीक बबन दशरथ आढाळे (६८) रा.के.सी.पार्क समोर त्रिभुवन कॉलनी कानळदा रोड जळगांव या इसमास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या कब्जातून गावठी हातभट्टीसह देशी दारुचा एकुण 1850 रुपयांचा अवैध माल मिळून आला.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी रविंद्र मोतीराया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत वाचक पोलिस उप निरिक्षक सुनिल पाटील, पोलिस हवालदार किरण निंबालाल धमके, पो.हे.कॉ. विजय माधव काळे, पो.हे.कॉ. राजेश चौधरी यांनी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here