इरफान पठाण 20-20 लिगसाठी श्रीलंकेत दाखल

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण क्रिकेटच्या मैदानावर आपले कसब दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. लंका प्रीमिअर लीग साठी इरफान खेळणार आहे.

अभिनेता सलमान खान याचा भाऊ सोहैल खानच्या मालकीच्या कँडी टस्कर्स संघाच्या वतीने इरफान सामना खेळणार आहे. या लीगसाठी तो श्रीलंकेत दाखल झाला आहे.

कँडी संघाकडून वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल, लंकेचा कुसल परेला, कुसल मेंडीस, नुवान प्रदीप आणि इंग्लंडचा लायम प्लंकेट आदी खेळाडू यात सहभाग घेणार आहेत. लंका प्रीमिअर लीगमध्ये कोलंबो, कँडी, गॅले, डम्बुल्ला आणि जापना असे पाच संघ खेळणार आहेत. त्यांच्यात 23 सामने होणार आहेत.

26 नोव्हेंबरपासून कोलंबो आणि कँडी यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. 13, 14 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीचे सामने आणि 16 डिसेंबर रोजी अंतिम सामना होईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here