जुगार अड्डयावरील धाडीत ३७ जणांविरुद्ध गुन्हा !

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : शहरातील मनीष कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावरील योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक (धरणगाव) मंडळाच्या नावाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत रोकडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या धाडीत विविध बड्या हस्ती सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. या ठिकाणी लोकांना पैसा लावून हार-जीत झन्ना मन्ना पत्ता जुगाराचा खेळ खेळण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

दोनच्या सुमारास पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता ज्ञानेश्वर महाजन (रा मोठा माळीवाडा, धरणगाव), जितेंद्र प्रल्हाद माळी (रा. संजयनगर), चारुदत्त रवींद्र पाटील (रा. बळीराम पेठ), हरिचंद्र प्रल्हाद बडगुजर (शनिपेठ), हेमेंद्र संजय महाजन (नवीपेठ), प्रवीण पाटील (आर.एल. कॉलनी), ललित गणेश चौधरी (ईश्वर कॉलनी), सलीम खान मुसाखान (शिवाजीनगर), अनिल माधवराव दायमा (पोलन पेठ), रोहित राजेंद्र शिंदे (ईश्वर कॉलनी), हीतेंद्र मोतीलाल शर्मा (मानराज पार्क),

अशोक सुभाष शर्मा (कांचन नगर), प्रवीण तूकाराम हिंगोले (महाबळ), जितेंद्र अनिल सोनार (विठ्ठल पेठ), सय्यद रिजवान सय्यद जफर (खडका रोड भुसावळ), भूषण साहेबराव पाटील (पारख नगर,जळगाव), शेख शकील शेख रशीद (मेहरुण), अरुण पाटील (गार्डी), मोतीलाल कृष्णानी ( सिंधी कॉलनी पाचोरा) रहेमनतुल्ला खान गुलशेर खान (नागझिरी मोहल्ला, रावेर), संदीप चौधरी (शिव कॉलनी), सतीश चौधरी (खोटे नगर), सुरेश कोळी (गुरुदेव नगर,जळगाव), समाधान सपकाळे (अयोध्यानगर, जळगाव), सय्यद इर्शाद अली बालम अली (गेंदालाल मिल), मुनाफ मनियार (धरणगाव), शेख इब्राहिम शेख चांद (शनिपेठ),

गणेश आत्माराम महाजन (गुरव गल्ली धरणगाव) रवींद्र प्रतापसिंग क्षत्रिय (मोठा माळीवाडा, धरणगाव), मनोज जयंतीलाल राज (हरिओम अपार्टमेंट बोरवली मुंबई), सचिन गवळी (शनीपेठ जळगाव), गोपाळ वासुदेव बडगुजर (लोहार गल्ली धरणगाव), गुड्डू सहानी (सुप्रीम कॉलनी,जळगाव), गोविंदा विठ्ठल दापसे (जुना,आसोदारोड, जळगाव) शेख अब्दुल्ला शेख रहेमान (मराठे गल्ली धरणगाव), मयूर नरेंद्र चंदनकर (बळीराम पेठ,जळगाव), सागर भीमराव सोनवणे (वाल्मिक नगर, जळगाव)

अशा ३७ जणांकडून रोख रकमेसह, मोबाईल, कार, असा एकूण १९ लाख, ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. धनंजय येरुळे, पो.नि. भिमराव नंदुरकर, स.पो.नि. रविंद्र बागुल, उपनिरीक्षक अरुण सोनार, उपनिरिक्षक चंद्रकात पाटील, कॉन्स्टेबल फुसे, उन्हाळे, प्रणेश ठाकरे, रतन गिते व पोना किशोर निकुंभ आदींच्या पथकाने केली.
या धाडीमुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here