कुमार चिंता यांनी वाढवली गुन्हेगारांची बेशुमार चिंता

जळगाव : दिवाळीच्या दिवशी जळगाव शहरातील जे.के.पार्क परिसरात सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी आपल्या पथकाच्या मदतीने झन्ना मन्ना जुगार खेळणा-या सहा जणांवर कारवाई केली. त्यानंतर त्याच दिवशी शहरातील के.सी.पार्क परिसराअत हातभट्टी व देशी दारुची बेकायदा विक्री करणा-या एका जणावर कारवाई केली. या कारवाईने दिवाळीच्या दिवशी झन्ना मन्ना खेळणारे व बेकायदा दारु विक्री करणारा इसम पोलिसात जमा झाला.

त्यानंतर मध्यरात्री जळगाव शहरात दोन जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करुन कुमार चिंता यांनी खळबळ माजवली आहे. जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चित्रा चौकात केलेल्या कारवाईत बडे जुगारी पकडण्यात आले.

पहिल्या कारवाईत 19 लाखाचा मुद्देमाल आणि 37 संशयीत पकडण्यात आले. दुस-या कारवाईत 13 संशयीतांना पावने दोन लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

याशिवाय शहरातील नारखेडे मटण हॉटेल येथे निलेश प्रभाकर भावसार (कासमवाडी – जळगाव) आणि योगेश प्रकाश पाटील (गोपाळपुरा – जळगाव ) या दोघा जणांना देशी विदेशी दारु विनापरवाना विक्री करतांना तसेच नऊ ग्राहकांना मद्य प्राशन करतांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेले नऊ ग्राहक पुढीलप्रमाणे आहेत. सुखलाल तुकाराम भिल (गावठाण – उमाळा), वना राघो चव्हाण (उमाळा), सुभाष मधुकर पाटील (तुकारामवाडी जळगाव), शशिकांत देवीदास पाटील (गोपाळपुरा – जळगाव), निखील राजेश सोनवणे ( गणपती नगर कुसुंबा), संतोष नारायण बेडीसकर (अनुराग स्टेट बॅंक कॉलनी जळगाव), योगेश मोहन मर्दाने ( गुरुनानक नगर, मायादेवी मंदीराजवळ जळगाव), राजपुरण ढंढोरे ( गुरुनानक नगर, मायादेवी मंदीराजवळ जळगाव), संतोष श्रावण वाघ (दरेकर वस्ती निफाड, नाशिक) या सर्व अकरा जणांवर मुंबई प्रोहिबिशन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here