कार जळाली मात्र चौघे बचावले

जळगाव : आज दुपारी आकाशवाणी चौकात एरंडोलच्या दिशेने जाणा-या कारच्या इंजीनला आग लागण्याची घटना घडली. कार जळून खाक झाली असली तरी त्यातील चोघे प्रवासी मात्र बालंबाल बचावले आहेत.

आज दुपारी गुजरात पासींगची कार (जीजे 9 सीएच 9449) एरंडोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी सुदैकाने कार रेड सिग्नलवर उभी होती. त्यावेळी अचानक कारच्या बोनटमधून धुर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी प्रसंगावधान राखत चौघे जण पटापट कारमधून बाहेर आले. कारच्या इंजीनमधील धुराचे रुपांतर आगीत होण्यास वेळ लागला नाही. काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. पुढील काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. कारचा जळून कोळसा झाला. कारचे नुकसान झाले असले तरी चौघा प्रवाशांचा लाख मोलाचा जिव वाचला.

काही वेळाने अग्निशमन दलाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी कार मात्र जळून खाक झाली होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here