गावठी कट्यासह तरुणास चाळीसगावात अटक

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : चाळीसगाव शहरातील घाटरोड नजीक नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात चाळीसगाव शहर पोलिसांनी एका तरुणास गावठी कट्यासह ताब्यात घेत अटक केली आहे. सदर तरुणाविरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री 10.20 वाजता पोलिस नाईक भगवान उमाळे, पंकज पाटील, पो.कॉ. निलेश पाटील, अमोल पाटील यांच्या पथकाने घाट रोड परिसरातून चांद सलीम सैय्यद (23) नागद रोड झोपडपट्टी यास संशयासपद अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 30 हजाराचा गावठी कट्टा, मॅगझीन, 3 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.

या कारवाईदरम्यान त्याचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरु आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. सैय्यद करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here