विजबिल 3 ते 12 हप्त्यात भरण्याची मुभा

मुंबई : वाढीव वीज बिले आणि कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीमुळे लाखो वीज ग्राहकांना विज बिलांचा भरणा शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी मधला मार्ग म्हणून महावितरणकडून वीज ग्राहकांना बिलांचा भरणा करण्यासाठी तीन ते बारा सुलभ हप्त्यांचा पर्याय दिला जाणार असल्याचे समजते.

थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या वीज ग्राहकांसह सध्या चालू बिलांचा एकरकमी भरणा करणे शक्य नसणा-या ग्राहकांना या सुविधेचा लाभ होणार आहे.

महावितरणची एकूण थकबाकी 59 हजार कोटींची आहे. यापैकी 42 हजार कोटी रुपये कृषी पंपांची थकबाकी आहे. शेतक-यांकडून वीज बिलांची वसूली राजकीय हस्तक्षेपामुळे त्रासदायक ठरत आहे. इतर 17 हजार कोटींची वसूली करण्यासाठी महावितरण नवे धोरण ठरवत आहे.

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या वीज ग्राहकांकडील थकबाकी वसूलीसाठी वन टाईम सेटलमेंटची सुविधा महावितरणकडून दिली जात आहे.
वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या अनेक औद्योगिक ग्राहकांची उद्योग सुरु करण्याची तयारी आहे. मात्र त्यांना वन टाईम सेटलमेंटसोबत हप्त्यांचे धोरण एकाच पँकेजमध्ये हवे आहे. कित्येक ठिकाणी मुळ बिलांच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त असल्यामुळे तीची वसूली अशक्य झाली आहे.

लघूदाब, उच्चदाब वीज ग्राहकांसाठी हे धोरण लागू राहणार आहे. कृषी पंपांचा यामधे समावोश नसेल. बिलांबाबत कायदेशीर वाद नसलेल्या अथवा असल्यास तो मागे घेण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे. चालू बिलाची रक्कम थकबाकी असल्यास त्यांना कोणत्याही स्वरुपाच्या डाऊन पेमंटची गरज राहणार नाही. अन्य ग्राहकांना 30 टक्के डाऊनपेमंट भरुन हप्त्यांच्या सवलतीचा फायदा घेता येणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here