तरुणी दिसताच मद्यपीने केले हाय…. मार पडताच केले बाय

जळगाव : जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील महिला महाविद्यालय परिसरातील तरुणीला एका मद्यपीने हातवारे करत हाय असा इशारा केला. ते हातवारे त्या मद्यपीला चांगलेच महागात पडले. उपस्थित जमावाने त्याला बेदम पब्लिक चोप दिला. जमावाचा अजून मार पडण्यापुर्वीच आलेल्या पोलिसांनी त्याला बचावाचे कवच देत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आणले.

भारत नानकराम रामचंदानी (सिंधी कॉलनी) असे पब्लिक मार बसणा-या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अठरा वर्षाची महाविद्यालयीन तरुणी स्टेडीयम चौकातील महाविद्यालयानजीक उभी होती. त्यावेळी भारत रामचंदानी हा देखील तेथे आला होता. तरुणी दिसताच मद्याच्या नशेत त्याला हायसे वाटले. हायसे वाटताच त्याने तरुणीला हाय केले. तरुणीने वारंवार दुर्लक्ष करुन देखील त्याचे हाय सुरुच होते. अखेर त्या तरुणीने तिच्या नातलगांना मोबाईलद्वारे संदेश देत घटनास्थळावर बोलावून घेतले. दरम्यान तरुणीने उपस्थित लोकांना हा प्रकार कथन केला. त्यामुळे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम चोप दिला

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here