जळगावचा मिसींग तरुण सापडला गुजरातला


जळगाव : काहीतरी करुन दाखवतो, मोठा बनुन दाखवतो असे रागाच्या भरात म्हणत जळगाव शहरातून निघून गेलेल्या तरुणाचा जिल्हा पेठ पोलिसांनी शोध लावला. त्याला गुजरात राज्यातून जळगावला आणून त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आले आह

विपुल रविंद्र सोनवणे हा यावल तालुक्यातील पथराळे येथील तरुण जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेत होता. काहीतरी करुन दाखवू, मोठा व्यक्ती बनून दाखवतो असा निश्चय करत त्याने 13 जुन रोजी जळगाव सोडले होते. तो थेट गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे काम करण्यासाठी निघून गेला होता. तेथे तो मिळेल ते काम करु लागला. मात्र त्याला नंतर घरची आठवण येवू लागली.

दरम्यान तो हरवल्याबाबत त्याच्या भावाने जिल्हापेठ पोलिस स्टेशनला मिसींग दाखल केली होती. जिल्हापेठ पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याचे नातेवाईक देखील त्यांच्या पातळीवर शोध घेतच होते. दरम्यान जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. विलास शेंडे यांना तो गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली.

पो.नि. विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.किशोर पवार यांच्यासह पोलीस नाईक अजित पाटील, फिरोज तडवी, तपासी अंमलदार पोलिस नाईक प्रविण भोसले यांनी शोध घेत गुजरात राज्यातील अंकलेश्वर गाठले. तो अंकलेश्वर येथे असल्याची खात्री पथकाची खात्री झाली.

पथकाने त्याला शोधून पो.नि. विलास शेंडे यांच्या समक्ष हजर करण्यात आले. तब्बल सहा महिन्यानंतर विपुल सोनवणे जळगावला आला. सहा महिन्यांनी विपुल नजरेसमोर दिसताच त्याचा भाऊ दिपक सोनवणे याच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सर्व कायदेशीर पुर्तता केल्यानंतर विपुल सोनवणे यास त्याचा भाऊ दिपकच्या ताब्यात देण्यात आले. काहीतरी करुन दाखवण्याच्या नादात घर सोडून गेलेला विपुल स्वगृही परत आल्यामुळे त्याच्या परिवाराने जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाचे आभार मानले

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here