बीएचआरची चौकशी संपल्यानंतर खडसे करणार धमाका?

जळगाव : बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेची सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे अधिक माहिती देवून धमाका करणार असल्याचे समजते.

या प्रकरणात अनेक दिग्गज अडकले असून संस्थेची मालमत्ता मातीमोल भावात घेतलेल्या काही आमदार, खासदार व मंत्र्यांची माहिती खडसे यांच्याकडे आहे. आता चौकशी झाल्यानंतर खडसे कुणाकुणाची काय माहिती देवून समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एकनाथराव खडसे यांनी राज्य सरकारकडे बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत सन 2018 पासून जवळपास पंधराहून अधिक तक्रारी केल्या आहेत. यापुर्वीच्या सरकारने या पतसस्थेवर तसेच पतसंस्थेशी संबंधीतावर कारयावा थांबवल्या होत्या असे आता खुलेआम बोलले जात आहे.

मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा २००२ नुसार कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्यामुळे राज्याचे सहकार आयुक्त गप्प बसून होते. त्यांनी हा चौकशी अहवाल शासनदरबारी रवाना केला होता. मात्र राज्य सरकारने चौकशी थांबवून ठेवली होती असा आरोप होत आहे. दरम्यान या प्रकरणी अनेक दिग्गज अडकले असल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याचे दिसून येत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here