गुन्हयासोबत शिक्षेचा बसेल का मेळ? कारवाईचा तर होत नाही ना खेळ ?

Dr.panjabrao ugle

जळगाव जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हयातील जनतेचे सरंक्षण करण्याची
जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे त्या जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून जळगावकरांची अपेक्षापुर्ती
होत नसल्याची सध्या ओरड सुरु आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जिल्हा वाचवण्यासाठी
अपेक्षित असणारा सोशल डिस्टन्सिंग पाळला जात आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी
जिल्हा पोलिस अधिक्षकांवर जेवढी आहे तेवढीच जिल्हाधिका-यांवर देखील सांगितली जाते.
तथापी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले हे मात्र जिल्हाधिका-यांच्या मागे लपून
आपली जबाबदारी टाळू पाहतात असे लोक आता उघडपणे बोलत असल्याचे दिसून येते. दरम्यान दोन
पोलिस कर्मचा-यांच्या बडतर्फीच्या कारवाईतून पोलिस अधिक्षकांची भुमिका सध्या चर्चेत
आली आहे.

काही दिवसांपुर्वी चाळीसगाव शहर पोलिस
स्टेशनचे सहायक फौजदार बापुराव भोसले व पो.कॉ. गोपाळ बेलदार यांना लाच मागितल्याच्या
(लाच घेतल्याच्या नव्हे) प्रकरणात सेवेतून निलंबीत करण्याएवजी कायमस्वरुपी बडतर्फ केले
आहे. पोलिस अधिक्षकांच्या या कारवाईबाबत कुठेतरी अन्याय झाल्याचे बोलले जात आहे. याच
पोलिस अधिक्षकांच्या काळात सहायक फौजदार बापुराव भोसले यांना पोलिस महासंचालक पदकाने
सन्मानित करण्यात आले आहे. वास्तविक या लाच प्रकरणात तक्रारदार हा खासगी आहे. लाचेची
तक्रार अ‍ॅन्टीकरप्शन अधिका-याने दाखल करायला हवी होती असे बोलले जाते. या प्रकरणी
तक्रार ही वास्तविक पोलिस कर्मचारी बेलदार याच्याविरुद्ध असल्याचे समजते. मात्र प्रकरण
भोसले यांच्या अंगावर शेकले गेल्याचे उघडपणे म्हटले जात आहे. केवळ फोनवरील संभाषणाच्या
आधारे करण्यात आलेल्या एसीबीच्या कारवाईचा आधार घेत पोलिस अधिक्षकांनी दोघा कर्मचा-यांवर
कायम स्वरुपी बडतर्फीची उगारलेली कु-हाड कुठेतरी अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे.
या कारवाईमुळे ही कायद्याची फसवणूक आहे
? वरिष्ठांची
? की जनतेची? याचे उत्तर जनतेला हवे आहे.
कारवाई करतांना सर्व बाजू पडताळून शिक्षा किती तिव्र स्वरुपाची असावी
? याचा ग्राऊंड लेव्हलवर अंदाज घेत तपासणी केली पाहीजे असे म्हटले जाते. या गुन्हयात
लाचेची केवळ मागणी आहे
, लाच स्विकारलेली नाही. एखाद्या चोराने
जर शंभर रुपयांची चोरी केली असेल तर त्याला फाशीची शिक्षा सुनावली जात नाही. त्याची
शिक्षा त्याच्या गुन्हयाला अनुसरुन योग्य प्रमाणातच दिली जाते. तोच न्याय भोसले यांना
का लावला गेला नाही
? असा एक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला
जात आहे.

जुन्या काळातील राजेश खन्ना अभिनित रोटी
या चित्रपटातील गितातून एक संदेश देण्यात आला आहे. यार हमारी बात सुनो ………ऐसा
एक इन्सान चुनो जिसने पाप ना किया हो….असे त्या गिताचे बोल आहेत. एखाद्याला शिक्षा
देण्यापुर्वी आपण स्वच्छ असायला हवे. एखादा व्यक्ती असा दाखवा की ज्याने कधी पाप केले
नसेल. या जगात प्रत्येक व्यक्ती कुठे तरी कळत
, नकळत
चुक करत असतो. असा एकंदरीत त्या गिताचा सार आहे. एखाद्याला त्याच्या चुकीची शिक्षा
योग्य प्रमाणात मिळायला हवी असे म्हटले जाते.

बेलदार
व भोसले यांच्या विरोधात तक्रार देणा-या तक्रारदारास तसे अधिकार आहेत काय
? तक्रारदाराचे पोलीस दप्तरी कसे रेकॉर्ड
आहे
? हा प्रश्न लक्षात घेतल्यास याचा अर्थ असा नाही की रेकॉर्ड
चांगले नाही म्हणून त्याचेकडुन लाच घेण्यास कायदा व समाज मान्यता देतो. याठिकाणी लाचेची
मागणी होती व ती देखील गांजाची केस करु नये यासाठी. उद्या दारु
, मटका, जुगाराचे जिल्हयात असलेले दोन ते तीन हजार धंदेवाले, यांच्यापैकी कुणीही उठून कुणाही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फिर्याद
देण्यास पुढे येईल. शेकडो वाळु माफीयांच्या तक्रारीवरुन तसेच भ्रष्टाचाराचे शेकडो प्रकार
जिल्हयात जवळपास सर्व सरकारी कार्यालयात घडत आहेत.  अशा किती प्रकरणात पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले
हे शिखरावर कामगिरी असलेल्या जिल्हाधिकारी महोदय तसेच युनिट प्रमुखांना कारवाई करावयास
लावणार आहेत
?

स्वतः
चे अपयश लपवण्यासाठी केलेली कारवाई समाजमान्य नाही हे निश्चित. जळगाव जिल्हयाला कुणी
वाली नसल्यासारखी यंत्रणा वागत असल्याचे बोलले जात आहे. आर.टी.ओ. चेकपोस्टवर सुरु असलेला
परंतु कुणाला न दिसणारा भ्रष्टाचार सर्वश्रृत व हिंमत असल्यास विचार करण्यास भाग पाडणारा
आहे. सर्व विषयावर कुवत नसलेल्या युनिट प्रमुखावर लक्ष ठेवण्याचा आणखी एक भार जिल्हाधिकारी
महोदयावर येऊन पडतो असे जनतेत बोलले जात आहे. अशा अधिका-यांबद्दल अशाच किरकोळ प्रकरणाबाबत
 कुठेतरी कोपऱ्यात शासनास पत्र
पाठवावे लागेल
, अशी परिस्थिती जळगाव जिल्हयात निर्माण झाली आहे.
 

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले
यांनी भोसले व बेलदार या कर्मचा-यांवर केलेल्या कारवाईची कृती बघता हा पोलिस कर्मचा-यांच्या
मनोबलावर जोरदार आघात असल्याचे बोलले जात आहे. जिल्हयात कोरोनाची साथ असतांना काही
पोलिस कर्मचा-यांनी आपल्या कर्तव्यापासून पळ काढल्याची काही उदाहरणे आहेत. मालेगाव
बंदोबस्तासाठी गेलेल्या काही कर्मचा-यांनी आपली ड्युटी सोडून जळगावला येण्याचे काम
केले. त्यांना बडतर्फ करण्यात आले. कोरोना काळात भोसले यांनी पळ काढला नव्हता की ते
जिल्हा सोडून पळून गेले नव्हते.  

ज्यावेळी एखाद्या घटकाचा उद्रेक होतो
त्यावेळी जनतेचे लक्ष विचलीत केले जाते. तसाच काहीसा प्रकार जळगाव जिल्हयात सुरु असल्याचे
म्हटले जात आहे. जळगाव शहरासह जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
अशा परिस्थितीत जिल्हा पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेतून केला जात
आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here