कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

जळगाव : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक कार्याच्या गौरवार्थ शासनाने महिला शिक्षण दिन साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यानिमित्त उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने जनसेवेचे व्रत घेतलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा “समाज शिक्षिका पुरस्कार” सन 2020 – 2021 देवून त्यांचा सत्कार करणार आहेत. या सत्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल देऊन सभारंभपूर्वक गौरव केला जाणार आहे.

सदर पुरस्कार वितरण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी 3 जानेवारी 2021 रोजी रविवारी दुपारी बारा वाजता पर्यावरण शाळा, जळगाव येथे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सौ. अनुराधा वाणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी समर्पण संस्थेचे सचिव संजय भावसार, प्रा.सोपान बोराटे, प्रकाश शिरसाठ, अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी, जळगाव जनता बँकेच्या संचालिका सावित्री सोळुंके, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. शिक्षण दिनाचे औचित्य साधत “महिलांचे आरोग्य आणि सामाजिक समस्या ” या विषयावर व्याख्यान होईल. या कार्यक्रमात कर्तृत्ववान पुरस्कारार्थी महिला पुढीलप्रमाणे आहेत. शैक्षणिक क्षेत्र – अरुणा उदावंत ( पाचोरा ), प्रभावती बावस्कर, वर्षा अहिरराव, छाया पाटील (किनगाव) सामाजिक क्षेत्र – सुश्मिता भालेराव, वैशाली विसपुते, मिनाक्षी निकम (चाळीसगाव), सरीता नेरकर, हर्षाली पाटील, मनिषा मेथाळकर. राजकिय क्षेत्र – नगरसेविका सरीता नेरकर, मंगला बारी. वैद्यकिय क्षेत्र – कविता नेतकर. सहकार क्षेत्र – सौ. सावित्री सोळुंके, सौ. स्वाती भावसार. पत्रकारीता क्षेत्र – धनश्री बागुल, नाजनीन शेख. पोलिस विभाग – यशोदा कणसे. प्रकाशन क्षेत्र – संगिता माळी.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here