कैद्याकडून कारागृह पोलिसास जीवे मारण्याचा प्रयत्न

भंडारा : भंडारा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणा-या कैद्याने पोलिस कर्मचा-यास मारहाणीसह दगड उचलून जिवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी संबंधीत कैद्याविरुद्ध भंडारा पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिक बकाराम मेश्राम हा बंदी भंडारा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. रविवारी सकाळी बॅरेकच्या बाहेर येत त्याने दुसरा कैदी किरण शिवशंकर समरीत यास जमीनीवर आपटून मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांचा हाणामारी सोडवण्यासाठी कारागृह पोलिस चंद्रशेखर दयाराम घरत यांनी प्रयत्न केला. दोघा कैद्यांनी तुरुंग अधिका-यांसमक्ष देखील एकमेकांना मारहाण सुरुच ठेवली. त्यावेळी पोलिस कर्मचारी घरत यांनी मध्यस्ती केली असता कैदी कार्तिक मेश्राम याने त्यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ व मारहाण सुरु केली. त्यानंतर जवळच पडलेला मोठा दगड उचलून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. इतरांनी तो दगड हिसकावला. त्यामुळे दुर्घटना टळली. याप्रकरणी भंडारा पोलिसात आरोपी कैदी मेश्राम विरुद्ध भा.द.वि. 353 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्या आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here