नवापूरच्या नगरसेवकाची गुजरात राज्यात मद्य तस्करी उघड

नंदूरबार : गुजरात राज्यात दारुबंदी असली तरी महाराष्ट्रात दारुबंदी नाही. दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात महाराष्ट्रातून तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा तस्करीचा प्रकार नवापूर येथील अपक्ष नगरसेवक करत असल्याचे उघड झाले आहे. विशाल केशव सांगळे असे त्या अपक्ष नगरसेवकाचे नाव असून त्याच्याव्यतिरीक्त इतर दोघा साथीदारांना देखील गुजरात राज्यातील उकई पोलिसांनी अटक केली आहे.

8 मार्च रोजी दुपारी तिनच्या सुमारास एका कारमधून विदेशी दारुची तस्करी होत असल्याचा सुगावा उकई पोलिसांना लागला. पोलिसांनी गुजरातच्या दिशेने जात असलेल्या त्या कारला रस्त्यात अडवले. झडतीदरम्यान उकई पोलिसांना कारमधे 14 हजार 400 रुपये किंमतीची दारुचे स्टिन, 48 दारुच्या बाटल्यांचे नग आढळले. तीन लाख रुपये किमतीच्या कारसह तीन मोबाईल व मद्य असा जवळपास 3 लाख 52 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील तिघा जणांपैकी दोघे नवापूरचे असून एक नगरसेवक व एक गुजरात राज्यातील तापी जिल्ह्याच्या उच्चल तालुक्याचा रहिवासी आहे. किसन अजय मेहता असे नगरसेवकाच्या साथीदाराचे नाव आहे. नगरसेवकासह त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध भा.द.वि. 65 ई, 98(2)81 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here