जामीनावर सुटताच अट्टल चोरटा झाला सक्रीय, घरफोडीच्या गुन्हयात झाला पुन्हा गजाआड

काल्पनिक छायाचित्र

औरंगाबाद: चोरी घरफोडीच्या गुन्हयात जामीनावर सुटलेला अट्टल चोरटा लागलीच सक्रीय झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. मात्र पुन्हा घरफोडी केल्याने त्याला चोवीस तासात सातारा पोलिसांनी अटक केली. त्याच्यकडून सर्व मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला. 

आकाश उर्फ गयब्या (छोटा मुरलीधरनगर ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे . सातारा परिसरातील प्रियंका पांडूरंग कुदळे या २ जुलैच्या रात्री परिवारासह  रुममध्ये झोपल्या होत्या. चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश मिळवला.

हॉलमधील लोखंडी कपाट उघडून त्यातील सोन्याची एक तोळ्याची पोत, ५ ग्रॅमचे झुंबर , ३ ग्रॅमचे मंगळसूत्र, चांदीचे वाळे, चांदीचे पैंजण असा सुमारे ८० हजाराचा ऐवज चोरीला नेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात चोरी झाल्याचे समजल्यावर त्यांनी सातारा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाने तपास करत घटनेनंतर काही तासातच  संशयित आरोपी आकाश उर्फ गयब्या यास ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली. गुन्हा करतांना त्याच्या मदतीला अल्पवयीन साथीदार असल्याचे देखील त्याने कबुल केले. चोरीचा मुद्देमाल त्याने पोलिस पथकाला काढून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here