खिरोदा ते फैजपूर रस्त्याची झाली दुरावस्था

जळगाव : यावल तालुक्यातील फैजपूर ते रावेर तालुक्यातील खिरोदा या रस्त्याला गांधी मार्ग म्हणून ओळखले जाते. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सन 1936 मधे फैजपूर येथे कॉंग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्याकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या समर्थकांसह फैजपूर ते खिरोदा पायी गेले होते. खिरोदा हे गाव आपल्यासाठी तिर्थक्षेत्र असल्याचे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. अशा ऐतिहासीक रस्त्याची आज झालेली दुरावस्था झाली असून बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

या रस्त्याने पायी चालणे तसेच प्रवास करणे अतिशय जिकीरीचे झाले आहे. याप्रकरणी विविध माध्यमातून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र कुंभकर्णी प्रशासनाला या रस्त्याविषयी काही देणेघेणे नसल्याचे या परिसरातील शेतकरी वर्ग म्हणत आहे. यावल व रावेर तालुक्याच्या आमदारांच्या नजरेस देखील हा रस्ता पडत नसावा काय? असा प्रश्न जागरुक नागरिक विचारत आहेत. या रस्त्याने प्रवास करणा-या पादचारी वर्गासह वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. वाहनधारकांच्या संयमाची जणू काही परिक्षा बघण्याचे काम बांधकाम विभाग करत असल्याचे देखील या निमीत्ताने म्हटले जात आहे. खराब रस्त्यामुळे लहानमोठे अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे.

या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर होण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर झाले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे देखील म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here