पुण्याला असतांना वसुली करायच्या रश्मी शुक्ला – माजी खासदार हरीभाऊ राठोड

On: March 26, 2021 9:58 PM

मुंबई : फोन टॅपींग प्रकरणी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. या पार्श्वभुमीवर माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी देखील आरोप करण्यास सुरुवात केली आहे. पुणे येथे पोलिस आयुक्त पदावर असताना पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत बिल्डर लॉबीकडून रश्मी शुक्ला खंडणी जमा करत होत्या असा आरोप माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

पो.नि. धनंजय धुमाळ सन 2016 मधे एटीएस मधे नेमणूकीला होते. मात्र त्यांना प्रॉपर्टी सेलमधे नेमणूकीला दाखवत रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावर खंडणी जमा करण्याची जबाबदारी दिली होती असा आरोप धनंजय राठोड यांनी केला आहे. हा सर्व प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होता असे देखील राठोड यांनी म्हटले आहे.

रश्मी शुक्ला नागपूर येथे पोलिस उपायुक्त पदावर होत्या. त्यावेळी त्यांच्यात आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात समन्वय होता. त्यांना भाजपचा वरदहस्त असल्याची बाब सिद्ध होत असल्याचा आरोप केला जात आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर योग्य ती कडक कारवाई होण्याची मागणी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment