टरबुज वाहतुकीच्या नावाखाली गांजाची वाहतुक उघडकीस

जळगाव : टरबुज वाहतुकीचे निमित्त करुन त्याआड गांजा वाहतुक केली जाणार असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आज भल्या पहाटे केलेल्या छापेमारीत गांजा व दोन ट्रकसह एकुण 16 लाख 49 हजार 912 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे, सहायक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या निगरानीखाली हा छापा यशस्वी करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातून जाणा-या महामार्गावर नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ पहाटे तिन वाजता सापळा रचण्यात आला होता. यावेळी जळगावच्या दिशेने जाणा-या गुजरात पासींगच्या दोन संशयीत ट्रक (जीजे – 05 -बीयु -0177 व जीजे – 05-बीटी – 5155) अडवण्यात आले. दोन्ही ट्रकच्या चालकांची विचारपुस व झडती घेत घेतली असता दोन्ही वाहनांमधे टरबुजच्या मागे लपवण्यात आलेला प्रत्येकी 70 किलो 519 ग्रॅम व 71 किलो 133 ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा मिळून आला.

याप्रकरणी शब्बीर कालेखान पठाण (40) रा.अकबर की वाडी, खोलवड, ता.कामरिज,जि. सुरत – गुजरात, शेख अकील शेख लतीफ (34), रा. बापु नगर, झोपडपट्टी, खोलवाडा, ता. कामरिज जि. सुरत – गुजरात व त्यांचा तिसरा चालक साथीदार शेख शरिफ शेख रफिक (33), रा.मुस्लीम कॉलनी, उस्मानिया मशिद जवळ भुसावळ यांना भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला ट्रक व मुद्देमालासह आणण्यात आले. त्यांनी हा गांजा कुणाकडून आणला त्याबाबत कसुन चौकशी करण्यात आली. हा मुद्देमाल त्यांनी हमीद समशोद्दीन पलंगवाला, रा.नवीन इदगाहच्या पाठीमागे, भुसावळ याच्याकडून घेतला असल्याचे चौकशीत समोर आले.

हमीद समशोद्दीन याचा शोध घेण्यासह त्याच्याकडे अजुन गांजा आहे काय याची खात्री करण्यासाठी पोलिस पथक त्याच्या घरी गेले. मात्र सुगावा लागताच त्याने पलायन करण्यत यश मिळवले होते. त्याच्याकडे कोणताही गांजाच साठा मिळून आला नाही. चौघा आरोपींविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला भाग 6 गु.र.न. 140/21 एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 20, 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा स.पो.नि. गणेश धुमाळ यांनी दाखल केला. यातील फरार हमीद समशोद्दीन पलंगवाला याचा शोध सुरु आहे. ताब्यातील तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 8 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. भुसावळ विभागाचे डीवायएसपी तसेच सहायक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. या छाप्यात स.पो.नि. गणेश धुमाळ, स.पो.नि. अनिल मोरे, हे.कॉ. जिजाबराव मोरे, अयाज अली. सुनिल सोनवणे, पो.ना. रमण सुरळकर, समाधान पाटील, उमकांत पाटील, सुभाष साबळे, पो.कॉ. इश्वर भालेराव, कर्तारसिंग परदेशी तसेच तपासकामात सहायक फौजदार सुनिल सोनवणे, हे.कॉ. अनिल पाटील व किशोर महाजन यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिक्षक अर्चित चाँडक व पो.ना. किशोर महाजन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here