ऑक्सीजन गळतीने हाहाकारासह 22 रुग्ण मृत्युमुखी

नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पीटलमधील ऑक्सिजन टॅंकला लागलेल्या गळतीमुळे एकच हाहाकार उडाला. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणातील ऑक्सिजन वाया गेला. या घटनेत गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सीजन पुरवठा बंद पडल्यामुळे तब्बल 22 कोरोना रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

आधीच ऑक्सीजनची कमतरता असतांना त्यात गळतीमुळे मोठ्या प्रमाणात वाया गेलेल्या ऑक्सीजनला रोखण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. अखेर पाऊन तासानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी कशीबशी हा गळतीचा प्रकार बंद केला. मात्र या घटनेत 22 रुग्ण जिवानिशी गेले. गळतीच्या वेळी हॉस्पीटलमधे ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरवर 15 रुग्ण होते. ऑक्सिजन भरला जात असतांना टाकीला जोडलेल्या पाईपलाईनवर प्रेशर आले. या प्रेशरमुळे पाईपलाईन जोडणारे नोझल तुटले. बघता बघता ऑक्सिजनचे लोट परिसरात पसरु लागले. या गदारोळात वेल्डींग करत नोझल जोडण्यात आले असले तरी 22 रुग्णांचा जिव हकनाक गेला असल्याचे बोलले जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here