लुटारु डफलीची एलसीबी पथकाने वाजवली डफली

जळगाव : व्यापा-यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोळ्यात मिरची पुड टाकत सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड लुटून नेणा-या तिघांपैकी एका लुटारुस जळगाव एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे. आदर्श उर्फ डफली बाळू तायडे असे भुसावळ येथील आरोपीचे नाव आहे.

साकेगाव शिवारातील फार्मसी महाविद्यालयाच्या मागे विट भट्टीजवळ विनोद बजरंग परदेशी या व्यावसायीकाची 19 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लुट झाली होती. या घटनेत तिघा लुटारुंनी विनोद परदेशी ( रा. साकेगाव – भुसावळ) यांची मोटारसायकल अडवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यांचे दोन्ही हात पाठीमागे धरुन त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकत गळ्यातील दोन सोन्याची चैन, मोबाईल व रोख 75 हजार रुपये असा एकुण 2 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गु.र.न. 53/21 भा.द.वि.394, 341 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेंद्र पाटील, अशोक महाजन, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, सुरज पाटील, राजेंद्र पवार, दिपक चौधरी यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशात पळून गेलेल्या आदर्श उर्फ डफली बाळू तायडे यास ताब्यात घेत अटक केली. त्याला पुढील तपासकामी भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार असलेल्या दोघांचा तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here