जळगावातील दाम्पत्याच्या हत्येचे कारण अजून अस्पष्ट

जळगाव : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या कुसुंबा या गावी दाम्पत्याची गळा आवळून हत्या झाल्याचे आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुरलीधर राजाराम पाटील (47) व आशाबाई मुरलीधर पाटील (38) असे हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

कुसुंबा या गावी स्वामी समर्थ शाळेजवळ राहणा-या या दाम्पत्याचा आज मृतदेह आढळून आला. इमारतीच्या गच्चीवर मुरलीधर पाटील यांचा तर त्यांची पत्नी आशाबाई यांचा मृतदेह किचन जवळ आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत तपासकामाला सुरुवात केली. या दाम्पत्याचा खून कुणी व कशासाठी केला याचे कोडे अजून उलगडलेले नाही. एमआयडीसी पोलिस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी या घटनेप्रकरणी तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here