पोलीस निरीक्षक सुनील माने अटकेत

मुंबई : पोलिस निरिक्षक सुनिल माने यांना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. सध्या सशस्त्र पोलिस दलात असलेले सुनिल माने यापुर्वी कांदीवली गुन्हे शाखा युनिट अकराला कार्यरत होते. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये सुनील माने यांची काही दिवसांपुर्वी चौकशी झाली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यूचा तपास एनआयएकडे आला होता. मृत्युपुर्वी मनसुख हिरेन यांना कांदीवली गुन्हे शाखेतून चौकशीकामी फोन आला होता असा दावा त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी केला होता. हिरेन घराबाहेर पडल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here