रुग्णवाहिकेतून दारुची वाहतुक

संगमनेर : रुग्णवाहिकेतून चक्क देशी दारुची वाहतुक सुरु असल्याचे संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणले आहे. आज 23 एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नाकाबंदी दरम्यान हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. संगमनेर शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. मुकुंद देशमुख यांना नाकाबंदी दरम्यान संशय आल्यामुळे त्यांनी या रुग्णवाहिकेला थांबण्याचा इशारा केला. सदर रुग्णवाहिकेच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात देशी दारुचा साठा आढळून आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here