पाचोरा मतदार संघात होणार ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मीती – आ. किशोर पाटील

पाचोरा : कोरोना संसर्गामुळे भविष्यातील दुरगामी आरोग्य उपाययोजनेचा भाग म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आगामी काही दिवसात हे प्रकल्प (प्लांट) कार्यान्वित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकल्प उभारणीसाठी अधिकाऱ्यांसमवेत आ.किशोर पाटील यांनी पाचोरा येथील गोराडखेडा रस्त्यालगत नियोजित ट्रामा केअर सेंटर व पाचोरा रुग्णालया शेजारच्या जागेची पाहणी केली.

या नियोजित प्रकल्पात दिवसाला पाचोरा तालुक्यात 78 व भडगाव प्रकल्पात 78 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. पाचोरा तालुक्यासाठीचा हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालया शेजारील जागेवर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. भडगाव तालुक्यासाठी हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालयालगत उभारण्यात येणार आहे.
पाचोरा व भडगावला रस्ते वाहतूकीने जळगाव वा इतर ठिकाणाहून ऑक्सिजन पोहचतो. यात अनेकदा अडचणी येतात. मतदार संघातील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोऱ्यासाठी 50 लक्ष व भडगाव साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 50 लक्ष रुपयांची मागणी त्यांनी केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची सर्वत्र मागणी वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबीची गंभीर दखल आमदार किशोर अप्पा पाटील यांनी सुरुवाती पासून घेत अनेक उपाय योजना केल्या आहेत. पाचोरा शहरात भडगाव सह शेजारील जामनेर, सोयगाव, शेंदूरणी,पहूर, तिडके, आदी भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल होत असतात त्यामुळे आरोग्य सेवा अधिक ताण पडत असतो.

दरम्यान जागेच्या पाहणी प्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकिय आधीकरी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे,अबूलेस शेख ,शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, भरत खंडेलवाल, यांची उपस्थिती होती. .पाचोरा ग्रामीण रुग्णालयाकरिता चारशे रेमेडिसिव्हर ,भडगाव ग्रामीण रुग्णालयासाठी 250 इंजेक्शन व पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 50 इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here