क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन संस्थेचा अभिनव उपक्रम

डोंबिवली (प्रतिनिधी) : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची निर्मीती झाली आहे. समाजातील सेवाभावी वृत्ती बाळगून असलेल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेचे योग्य रितीने मार्गक्रमण देखील सुरु आहे. आपल्याला कोणी मागेल तेव्हाच देण्यापेक्षा कुणाला कशाची गरज आहे, हे ओळखून ही संस्था विविध वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना भेटी देत असते. तर वीट भट्टीवरील कामगार महिला व पुरुषांना आवश्यक वस्तू व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करत असते.

अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे कार्यरत असलेल्या आधारतीर्थ आश्रमात असलेल्या अनाथ मुलांसाठी संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सीमा वखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य स्टेट कमिटी मेंबर चित्रा उर्फ श्रावणी कामत यांच्या नेतृत्वाखाली सुरेशजी गायकवाड , रत्नप्रभा गायकवाड व चालक मंगेश गमरे यांनी आश्रमात जाऊन जीवनोपयोगी वस्तू देऊन खारीचा वाटा उचलला. कोरोना काळ व लॉकडाऊन असल्याने असे आश्रम चालवतांना अनेक अडचणी येत असतात अशावेळी आपण स्वतः हून मदतीचा हात दिला पाहिजे असं क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी सांगितले ,सीआरडब्लूएच्या सदर संस्थेचे पदाधिकारी व स्वंयसेवक हे विविध जिल्ह्यांत कार्यरत आहेत. आम्हाला अभिमान आहे .अशा सर्व पदाधिकारी व स्वंयसेवकांचा जे समाजासाठी सदैव तत्पर असतात . असं राजेंद्र वखरे म्हणाले. चला पेटवू या दिवे, ज्या ठिकाणी अजूनही अंधार आहे. हे ब्रिद वाक्य घेऊन संस्था कार्यरत आहे. स्वातंत्र्य सैनिक कै.व्यकंटेश विष्णू कामत यांच्या २२ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून संस्थेने वेगळा उपक्रम राबविला.व त्यांच्या कार्याला उजाळा दिला. संस्थेच्या वतीने नागरिकांनी लस घ्यावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here