दुहेरी खुनाचा तपास अंतिम टप्प्यात

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील ओम साई नगरात बुधवारी रात्री झालेल्या दुहेरी खूनाचा तपास जवळपास अंतिम टप्प्यात असून लवकरच या खून प्रकरणाचा उलगडा होणार आहे. मुरलीधर राजाराम पाटील व आशाबाई मुरलीधर पाटील अशी या घटनेतील मयत दाम्पत्यांची नावे आहेत. गुरुवारी उघडकीस आलेल्या या दुहेरी खुन प्रकरणी पोलिसांनी चौघांन ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यातील चौघांमधे दोन पुरुष व दोन महिला असल्याचे म्हटले जात आहे. व्याजाच्या पैशांच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे म्हटले जात असून लवकरच या खूनाचा उलगडा होणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here