एसपींच्या नावे बनावट फेसबुक खाते उघड

यवतमाळ : एसपी यवतमाळ या नावाने बनावट खाते उघडून एकाने थेट एस.पी. रुग्णालयात दाखल असल्याचे सांगत फेसबुकवरील मित्रांना पैशांची मागणी केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधीताविरुद्ध यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवतमाळचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ असून ‘एसपी यवतमाळ’ हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे. कुणीतरी ‘एसपी यवतमाळ’ नावाचे फेसबुक खाते तयार करुन त्यावर पोलिस अधिक्षकांचा फोटो अपलोड केला आरोपीने मित्र आणि नातेवाईकांसोबत चॅटींग करत आर्थिक अडचण दाखवत पैशांची मागणी सुरु केली. गुगल पे असल्यास तातडीने पैशांची मागणी केल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या सर्व प्रकाराचा एका मित्राला संशय आला. त्याने थेट पोलिस अधिक्षकांसोबत संपर्क साधत हा गैरप्रकार लक्षात आणून दिला. त्यामुळे पोलिसांनी हे बनावट खाते तात्काळ बंद करत यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीच्या आधारे बनावट खाते तयार करणा-या अज्ञाताविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here