वाकडी येथे सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणी

गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाकडी ग्रामपंचायतने कसोशीने प्रयत्न सुरू केले असून कोरोना गावात येऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने गावात सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे या करिता गावात वेळोवेळी दवंडी देऊन कोरोना विषयी माहिती दिली जात आहे . दि. 24 एप्रिल रोजी गावातील सर्व गल्लीबोळात सोडीयम हायड्रो क्लोराईड फवारणी करण्यात आली. गावातील सर्व शासकीय कर्मचारी व आरोग्य समिती यासाठी प्रयत्नशील असून ग्रामपंचायतीला सहकार्य करत आहे.

आरोग्य सेवक,आशाताई अंगणवाडी सेविका याचे दररोज गावात कोरोना विषयी जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य चालू आहे. याकामी उपस्थित सरपंच देवकाबाई ज्ञानेश्वर महाकाळ, उपसरपंच छायाबाई रवींद्र शिंपी, ग्रामसेवक राजेश ढेपे ग्रामस्थ मंडळी व उप्पलखेडा ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मास्क वापरावा, घरातच थांबावे, बाहेर जाणे टाळावे असे आवाहन वाकडी ग्रामपंचायत केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here