जळगाव जिल्हा पोलिस दलात खांदेपालट

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकांनी काही पोलिस अधिका-यांना नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षातील अधिका-यांना पोलिस स्टेशनला चार्ज दिला आहे. लवकरच अधिकारी आपल्या बदलीच्या जागी जाणार असल्याचे समजते.

धरणगावचे जयपाल हिरे यांना अमळनेर येथे पोस्टींग मिळाली असून ते लवकरच एक ते दोन दिवसात अमळनेर पोलिस स्टेशनची धुरा सांभाळणार आहेत. पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांचे भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला पुनरागमन होणार असून ते उद्या नव्याने बाजारपेठ पोलिस स्टेशनची सुत्रे हाती घेणार आहेत. पो.नि. जयपाल हिरे व दिलीप भागवत यांनी क्राईमदुनिया सोबत बोलतांना माहिती दिली. मुक्ताईनगरचे सुरेश शिंदे यांची प्रशासकीय कारणास्तव जळगाव नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षातील रामकृष्ण पवार मुक्ताईनगरला जाणार आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here