चौकशीची घाई असेल तर प्रश्नावली पाठवा – रश्मी शुक्ला

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी अडचणीत आल्या आहेत. सध्या त्या चौकशीला उत्तरे देण्यास पुढे येणार नसल्याचे समजते. चौकशीची खुपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या मी त्याची उत्तरे पाठवून देईन असे उत्तर त्यांनी सायबर सेलला दिल्याचे म्हटले जात आहे. एसआयडी मधे कार्यरत असतांना काही मंत्र्यांचे फोन बेकायदा टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे.

सध्या केंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैद्राबाद येथे रश्मी शुक्ला नियुक्तीला आहेत. 28 एप्रिल रोजी सायबर पोलिस स्टेशनला हजर राहण्याचे समन्स त्यांना रवाना करण्यात आले होते. सध्याची कोविड परिस्थिती लक्षात घेता शुक्ला यांना चौकशीला हजर राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. खुपच घाई असल्यास प्रश्नावली पाठवून द्या मी त्या प्रश्नांची उत्तरे पाठवून देईन असे शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितले आहे. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन अनधिकृतपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here