परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा – अटकेची शक्यता बळावली

अकोला : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एकुण सत्तावीस पोलीस अधिकाऱ्यांविरोधात अकोला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला मध्यरात्री उशीरा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार विविध 22 कलमांचा आधार घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला पोलीस कंट्रोल रुममधे कार्यरत असलेले पोलिस निरिक्षक भीमराव घाडगे यांनी 20 एप्रिल रोजी परमबीरसिंह यांच्याविरुद्ध राज्य सरकार तसेच वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे मध्यरात्री परमबीरसिंह यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. परमबीर सिंह ठाणे पोलीस आयुक्तपदी असतांना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप असलेली तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आदींकडे केली होती. जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासह एकुण 27 पोलीस अधिकाऱ्यांवर भीमराव घाडगे यांनी अकोला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. शुन्य क्रमांकाने दाखल केलेली ही तक्रार ठाणे बाजारपेठ पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजुन काही गुन्हे दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच परमबीर सिंह यांना अटक देखील होऊ शकते असे म्हटले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here