रश्मी शुक्ला यांना बजावण्यात आले समन्स

आयपीएस बदल्यांच्या कथित रॅकेट प्रकरणी गोपनीय अहवाल लिक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांच्या चौकशीसाठी मुंबई येथे हजर राहण्याकामी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी असमर्थता दाखवली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आपण हैदराबाद येथील कार्यालय सोडू शकत नसल्यचे त्यांनी म्हटले होते. फारच घाई असेल तर प्रश्नावली पाठवून द्यावी आपण उत्तरे पाठवून देऊ असे त्यांनी म्हटले होते. त्यांना नव्याने 3 मे रोजी शुक्ला यांना चौकशीकामी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख असतांना गेल्या वर्षी 25 ऑगस्ट रोजी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटसंबंधी काही महत्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करुन अहवाल तयार केला होता. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी तो अहवाल गृहविभागाकडे सादर केला होता. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे आढळून आल्याने व शुक्ला यांनी शासनाची फसवणूक तसेच अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तो अहवाल नंतर फेटाळण्यात आला. या प्रकाराबद्दल शुक्ला यांनी माफी मागीतल्याने तुर्तास टळली होती. मात्र तोच गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने उघडकीस करत राज्य सरकारला धारेवर धरले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here