दोघा परिचारिकांनी परिचितांसाठी लसी केल्या लंपास?

जळगाव : जळगाव तालुक्यातील कानळदा लसीकरण केंद्रातील दोघा परिचारिकांनी कोविड लस लंपास करत थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनातील परिचितांना टोचून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उपस्थित नागरिकांच्या लक्षात आला. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता दोघा परिचारिकांना रंगेहाथ पकडले. आज दुपारी झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

जवळपास सर्वच ठिकाणी लसींची कमतरता आहे. लोक लसीसाठी दिवसभर ताटकळत उभे असतात. जळगाव तालुक्यातील कानळदा येथे दोघा परिचारीकांनी आज दुपारी लसी थेट रस्त्यावरील चारचाकी वाहनातील परिचितांना टोचून दिल्या. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दोघा परिचारिकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे दोघी नर्स गोंधळल्या. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. दरम्यान या प्रकाराची चर्चा सुरु होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here