पोलिस अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह घोषित

जळगाव : पोलिस दलातील उल्लेखनिय सेवेबद्दल पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सम्नानचिन्ह व प्रशस्तीपत्रे प्रदान केली जातात. जळगाव जिल्हा पोलिस दलातील विविध प्रकारच्या उत्तम कामगिरीबद्दल आठ पोलिस अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सम्नानचिन्ह जाहीर झाले आहेत.

लिलाकांत पुंडलिक महाले – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जिल्हा विशेष शाखा, शिवाजी राजाराम पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – जिल्हा विशेष शाखा, शशिकांत बाबुलाल पाटील – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, विजय माधव काळे – पो.हे.कॉ. एसडीपीओ कार्यालय जळगाव, सुनिल पंडीत दामोदर – पो.हे.कॉ. स्थानिक गुन्हे शाखा, मनोज आण्णा मराठे – पोलीस नाईक (सध्या धुळे येथे बदली झालेले), महेश रामराव पाटील – पोलीस नाईक पारोळा पो.स्टे., संदीप श्रावण सावळे – पोलीस नाईक स्थानिक गुन्हे शाखा यांना हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव लक्षात घेता हा कार्यक्रम होणार की नाही याबाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सम्नानचिन्ह व प्रशस्तीपत्रे जाहीर करण्यासाठी समिती तयार केली होती. या समितीत समिती प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व प्रभारी पोलीस उपअधीक्षक डी.एम.पाटील, पोलीस निरीक्षक बापु रोहोम – जिल्हा विशेष शाखा,जळगाव, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले – स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे यांचा समावेश करण्यात आला होता. सदर समितीने जळगाव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर नेमणुकीस असलेले सर्व पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार यांच्या सेवापटाची छानणी करुन दहा पोलीस अधीकारी / पोलीस अंमलदार यांचा सेवापट पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे पाठवला होता. समिती कडील प्राप्त नावांचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार उच्च श्रेणी लघुलेखक गंगाधर कदम , आस्थापना प्रमुख दिपक जाधव यांनी तयार केला होता. पाठवण्यात आलेल्या दहा प्रस्तावांपैकी जळगाव जिल्हयातील आठ पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सम्नानचिन्ह व प्रशस्तीपत्रे जाहीर करण्यात आली आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here