हैद्राबादला आठ सिंह कोरोनाबाधीत

हैद्राबाद : आता वन्य प्राण्यांना देखील कोरोनाने घेरले असल्याचे दिसून येत आहे. हैद्राबाद येथील नेहरु प्राणी संग्रहालयातील आठ सिंहांना कोरोनाची बाधा झाली आहे. सिंहाना कोरोनाची बाधा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दिसून आले आहे.

हैद्राबाद येथील नेहरु झुलॉजीकल पार्क जवळपास 380 एकरात पसरले आहे. या पार्क मधे सर्व प्रकारचे जवळपास दोन हजार प्राणी वास्तव्याला आहेत. या सिंहांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. या पार्कमधील सफारी क्षेत्रातील सिंहाचे नाक वाहणे, भुक मंदावणे यासह खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत. या पार्कमधे दहा वर्षाचे बारा सिंह असून त्यात चार नर व चार मादी सिंह कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here