‘फक्त चारच दिवस शिल्लक” – योगी यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : पुढील चार दिवसात जे काही करायचे असेल ते उरकून घ्या. पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना ठार केले जाईल अशा आशयाची धमकी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मिळाली आहे. सदर जिवे ठार करण्याची धमकी उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या हेल्पलाइन क्रमांकाशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजच्या माध्यमातून त्यांना मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या संदेशाची दखल घेत रितसर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला असून योगी यांच्या निवासस्थानासह इतर पन्नास ठिकाणी सुरक्षा देखील वाढवली आहे. मुख्यमंत्रीपदावर आरुढ झाल्यापासून योगी आदित्यनाथ यांना अशा प्रकारच्या विविध धमक्या मिळाल्या आहेत.

गेल्या महिन्यात एका धमकीप्रकरणी मुंबई येथील एका तरुणाला अटक करण्यात आली होती. सोशल मिडीया डेस्कच्या सहाय्याने कमरान आमिन नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याला उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात देण्यात आले होते. धमकी देण्यासाठी आपल्याला एक कोटी देण्यात आली होती असा खुलासा त्याने पोलिस पथकाला दिला होता. मात्र ही ऑफर कुणी दिली याचा खुलासा या तरुणाने दिला नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here