समुद्रातील बोट काढतांना बुडाला जेसीबी

विरार : वसई-पाचूबंदर येथे समुद्रात सापडलेली मासेमारी बोट काढण्यासाठी समुद्रात गेलेला जेसीबी भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत जेसीबीचालक बचावला असल्याचे म्हटले जात आहे.

वसई-पाचूबंदर येथे समुद्राच्या किनारी मासेमारी करणा-या बोटीचा दोर बांधून ठेवण्यात आला होता. मात्र अचानक बोटीचा दोर सुटल्यामुळे ही बोट वाहू लागली. या बोटीला बाहेर काढण्यासाठी जेसीबी समुद्रात उतरवला असतांना अचानक जोरात पाण्याची लाट आली. या लाटेत जेसीबी समुद्रात बुडाला. जेसीबी बाहेर काढण्यासाठी ओहोटीची वाट बघणे क्रमप्राप्त झाले आहे. पाचूबंदर आणि मर्सिस समुद्रकिनारी असलेल्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here