मियॉंखानच्या वेशात कृष्णप्रकाश यांच्या पोलिस स्टेशनवर धाडी

पिंपरी चिंचवड : आपल्या वेगळ्या स्टाईलने कारवाई करणारे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज रात्री चक्क ‘मियाँखान’च्या रुपात वेशांतर करत पोलीस स्टेशनवर सरप्राईज धाडी टाकल्या. मियॉंखानच्या वेशात पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश तर त्यांच्या जोडीला सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे या मियॉंची बिवी झाल्या होत्या.

कृष्णप्रकाश यांनी नकली दाढी व विग लावत आपला लुक बदलला होता. चेह-यावरील मास्कमुळे ते कुणाला ओळखता आले नाही. रात्री बारा वाजता खासगी टॅक्सीने आगमन करत त्यांनी पहिली धाड पिंपरी पोलिस स्टेशनवर टाकली. सामान्य तक्रारदारास कसा अनुभव येतो याचा अनुभव त्यांनी घेतला. आमच्या शेजा-याला रुग्णवाहीका हवी असून फोन केला तर आठ हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार त्यांनी ठाणे अंमलदारास केली. तक्रार दाखल करुन घेण्याची त्यांनी विनंती केली. हे आमचे काम नाही असे म्हणत पोलिसांनी त्यांना पिटाळून लावण्याचा प्रकार केला. ज्यावेळी आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपली खरी ओळख दाखवली त्यावेळी उपस्थित पोलिसांची भंबेरी उडाली.

त्यानंतर रात्री दिड वाजता कृष्णप्रकाश व प्रेरणा कट्टे या दोघांनी हिंजवडी पोलिस स्टेशन गाठले. या ठिकाणी कृष्णप्रकाश यांनी नवीच कथा कथन केली. आम्ही रमजानचे उपवास करतो व आमचे परिसरातील लोक फटाके वाजवत असल्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होतो. बोलायला गेले तर लोकांनी माझ्या पत्नीची छेडखानी केली व माझ्या कमरेत लाथा घातल्या अशी तक्रार कृष्णप्रकाश यांनी केली. याठिकाणी मात्र उपस्थित पोलिस कर्मचा-याने प्रामाणीकपणे कच्ची फिर्याद तयार करत वरिष्ठांना कळवतो असे म्हटले. सर्व नौटंकी संपुष्टात आणत त्यांनी चांगला अनुभव आल्यानंतर आपली ओळख दाखवली. या ठिकाणी देखील उपस्थितांची भंबेरी उडाली होती. त्यानंतर रात्री दोन वाजता या जोडीने डांगे चौक गस्ती पॉईंट गाठला. मात्र आयुक्त वेशांतर करुन फिरत असल्याची बातमी लिक झाल्यामुळे सर्वच जण सावध झाले होते. ही बाब आयुक्त व सहायक आयुक्तांच्या नजरेतून सुटली नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here