तृणमुलचे मंत्री सीबीआयच्या ताब्यात

On: May 17, 2021 11:54 AM

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाल्या. त्यानंतर लगेचच ममता यांच्या मंत्र्यांविरुद्ध नारदा घोटाळ्याची चौकशी सुरु झाली. नारदा घोटाळ्यात आरोप असलेले ममता यांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांच्यासह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या निवासस्थानी सीबीआयने धाडी टाकल्या आहेत्य. आपल्या मंत्र्यांना सीबीआयने चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाल्या.

सीबीआय पथकाने सोमवारी सकाळी परिवहन मंत्री व कोलकाता नगर पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. या घटनेचे वृत्त समजताच हकीम समर्थकांनी आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान सीबीआयच्या दुस-या पथकाने सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांच्या निवासस्थानी देखील छापेमारी करत दोघांना ताब्यात घेतले. या मंत्र्यांना अटक केली नसून चौकशीकामी ताब्यात घेतले असल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे. राज्यपालांनी निवडणूक संपताच तातडीने या नेत्यांवरील कारवाईला मंजुरी दिली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment