गोरगरिबांचा मसिहा सचिन सोमवंशी

On: May 19, 2021 8:18 PM

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील बाळद येथील एका शेतकरी ग्राहकाने त्याच्या हक्काच्या घरगुती विज मिटरसाठी दोन महिने विज मंडळ कार्यालयात जाऊन चपला झिजवल्या. मात्र त्याची कुणी दादपुकार घेण्यास तयार नव्हता. अखेर त्या शेतक-याने कॉंग्रेसचे पदाधिकारी व गोरगरिबांसाठी अर्ध्या रात्री धाऊन जाणारे सचिनदादा सोमवंशी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेत आपली व्यथा कथन केली. त्यानंतर त्या शेतक-याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एका चुटकीसरशी त्या शेतक-याचा प्रश्न सुटला. केवळ अर्ध्या तासात त्या शेतक-याला घरगुती विज मिटर बसवून मिळाले. ज्यांचा कुणी वाली नाही अशांसाठी पाचोरा शहर व तालुक्यात सचीनदादा सोमवंशी वाली असल्याची भावना त्या शेतक-याने जनमानसात व्यक्त केली. बाळद येथील शरीफखा पठाण असे त्या शेतक-याचे नाव असून त्याच्या चेह-यावर समाधान फुलले आहे.

यावेळी क्राईम दुनिया सोबत बोलतांना सचिनदादा सोमवंशी यांनी म्हटले की कॉंग्रेस हा पक्ष गोरगरिबांचा विचार करणारा पक्ष आहे. या पक्षाची आपली एक स्वतंत्र विचारधारा आहे. या पक्षाचे धैय्यधोरण आम्ही चांगल्या पद्धतीने राबवत आहोत. कॉंग्रेस नेत्या सोनीयाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्या विचारसरणीनुसार तळागाळातील जनतेला योग्य तो न्याय मिळण्यासाठीच हा पक्ष कार्यरत असल्याचे सचिनदादा सोमवंशी यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment