कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी केले अन्नदान

On: May 22, 2021 3:25 PM

पाचोरा : भारतात संगणक युगाची सुरुवात करणारे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांची नुकतीच पुण्यतिथी झाली. आज या कोविड आणि लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉम होम केवळ संगणकामुळे शक्य झाले आहे. या संगणक युगाची आपल्या देशात राजीवजी गांधी यांनी सुरुवात केली. अशा या नेत्याच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत कॉंग्रेसचे पाचोरा तालुक्याचे सुप्रिमो म्हटले जाणारे सचिन सोमवंशी यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने अन्नदानाचे कार्य पार पाडले. भुकेल्यांना अन्न द्यावे हे गाडगे बाबांचे शब्द सचिन सोमवंशी यांनी यानिमीत्ताने खरे केले.

याप्रसंगी सुरवातीला स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील,अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस इरफान मनियार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अॅड मनिषा पवार, तालुका अध्यक्ष कुसुम पाटील, शीला सुर्यवंशी सोशल मीडियाचे राहुल शिंदे, कल्पेश येवले, गजेंद्र पाटील, गणेश पाटील, शिवाजी पाटील, बबलु ढाकरे, सोनु पुजारी आदी सहका-यांची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर शहरातील स्टेशन रोड परिसर, भडगाव रोड परिसरातील गरजुंना जागेवर अन्नाचे पाकिटे देण्यात आली. यावेळी गरजूंनी त्यांचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment