बिलाच्या रकमेसाठी मंगळसुत्र जमा केले रुग्णालयाने

On: May 23, 2021 5:31 PM

बुलडाणा : कोविडचा उपचार पुर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज देतांना बिलाच्या उर्वरीत अकरा हजार रुपयांसाठी रुग्णाच्या पत्नीचे मंगळसुत्र ठेऊन घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका खासगी कोविड रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

मंगेश गवई या रुग्णाला सर्दी व ताप आल्याचे जाणवत होते. त्याने केलेल्या कोविड अ‍ॅंटीजेन तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र तरीदेखील लक्षणे जाणवत असल्यामुळे त्याला छातीचा एमआरआय करण्यास सांगण्यात आले होते. खामगाव येथील एका खासगी कोविड सेंटरमधे त्याला दाखल करण्यात आले होते. नऊ दिवसांचा उपचार घेतल्यानंतर रुग्ण मंगेश गवई याच्या हातात 81 हजार रुपयांचे बिल देण्यात आले.

रुग्ण मंगेश गवई याने 70 हजार रुपये जमा केल्यानंतर उर्वरीत 11 हजार रुपये घरी गेल्यानंतर आणून देतो असे त्याने रुग्णालय प्रशासनाला सांगितले. मात्र आत्ताच पैसे द्यावे लागतील असे सांगून त्याचा डिस्चार्ज नाकारण्यात आला. रुग्णाच्या पत्नीचे मंगळसुत्र जमा करा आणी पैसे आणून द्या अन्यथा सुटी मिळणार नाही असे रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. अखेर रुग्णाच्या पत्नीचे मंगळसुत्र जमा केल्यानंतरच रुग्ण मंगेश गवई यास सुटी देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment