अभिनेता करण मेहरा यास आज न्यायालयात हजर करणार

On: June 1, 2021 11:28 AM

मुंबई : “स्टार प्लस” या वाहिनीवरील “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेतील अभिनेता करण मेहरा यास आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी त्याची पत्नी निशा रावल हिने त्याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे करण यास काल पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

करण व निशा या दोघा पती पत्नीत लग्नानंतर कित्येक वेळा वाद झाले. हा वाद कित्येकदा विकोपाला गेला. दोघात कडाक्याचे भांडण झाल्यानंतर करण याने निशाला बेदम मारहाण देखील केली. या मारहाणीमुळे निशाने पती करण विरुद्ध गोरेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे करण विरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला काल अटक करण्यात आली आहे. आज करण यास न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment