जळगाव एसीबीची धुरा आता सतिष भामरे यांच्याकडे

On: June 1, 2021 3:18 PM

जळगाव : जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो युनिटचे पोलीस उप अधीक्षक गोपाल महादु ठाकुर यांचा शासकीय सेवा कालावधी काल दि. 31 मे रोजी संपुष्टात आला. त्यांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे त्यांच्या जागी आता उप अधिक्षक सतिष भामरे यांनी कार्यभार सांभाळला आहे.

उप अधिक्षक सतिष भामरे यांनी जळगाव पोलिस दलात सेवा बजावली आहे. बोदवड पोलिस स्टेशन, शहर वाहतुक शाखा तसेच नियंत्रण कक्ष अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली असल्यामुळे ते सर्वांना परिचीत आहेत. त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगल्या प्रकारे माहिती असल्यामुळे त्यांच्या कामकाजाचा जळगाव अ‍ॅंटीकरप्शन विभागाला निश्चितच फायदा होणार आहे.

सरकारी कामकाज करुन देण्यासाठी लोकसेवकाकडून कुणाला लाचेची मागणी होत असेल व त्यासंबंधी कुणाला तक्रार करायची असल्यास पोलीस उपअधीक्षक सतीष भामरे यांचा मोबाईल क्रमांक 8888834097 तसेच कार्यालय क्रं. 0257-2235477, टोल फ्री क्रं.1064 असा आहे. यापैकी कोणत्याही क्रमांकावर तक्रारदार आपली तक्रार करु शकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment