उपोषण स्थगितीसाठी दिपककुमार गुप्ता यांना विनंती

On: June 4, 2021 9:44 PM

जळगाव : जळगाव शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. सदर काम योग्य रितीने वेळेत पूर्ण होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता तथा आरटीआय कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी 7 जून रोजी उपोषण करण्याची परवानगी प्रशासनाला मागितली होती.

गुप्ता यांनी 7 जून रोजीचे आंदोलन स्थगित करावे यासाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी एका पत्राद्वारे त्यांना विनंती केली आहे. सदर पुलाचे काम लॉकडाऊन मुळे संथ गतीने सुरु होते अशी माहिती गुप्ता यांना बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच मक्तेदाराने आता कामाचा वेग वाढवला असल्याचे स्पष्टीकरण गुप्ता यांना देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment