बलात्काराच्या आरोपातील अभिनेता पर्ल पुरीला जामीन

On: June 6, 2021 3:30 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘नागिन ३’ फेम अभिनेता पर्ल पुरी यास बलात्काराच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली होती. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्या आरोपाखाली पोस्को कायद्यानुसार त्याला अटक झाली होती.

अभिनेता पर्ल यास केवळ जामीन मिळाला आहे. त्याची या प्रकरणातून अद्याप सुटका झालेली नाही. त्याला जामीन मंजुर झाल्याची माहिती त्याची गर्ल फ्रेंड करिश्मा तन्ना हिने समाज माध्यमातून दिली आहे. सत्यमेव जयते असे कॅप्शन देत तिने पर्लची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. टीव्ही सिरीयल निर्माती एकता कपूरने देखील पर्लची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकता कपूर निर्मीत नागीन या मालिकेत मुख्य कलाकाराची भुमिका पर्ल याने साकारली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment