“भाभीजी घरपर है” फेम सौम्या टंडन अडचणीत

On: June 6, 2021 4:52 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील भाभीजी घरपर है या मालिकेतील अनिता भाभीचे पात्र साकारणारी अभिनेत्री सध्या अडचणीत सापडली आहे. फ्रंटलाईन वर्कर असल्याचे सांगत बेकायदा कोरोना लसीकरण केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे.

काही दिवसांपुर्वी प्रियंका चोप्राची बहिण मिरा चोप्रा देखील अशाच प्रकरणात चर्चेत आली होती. आता सौम्यावर बेकायदा कोरोना लस घेतल्याच्या आरोप केला जात आहे. एक ओळखपत्र उघड झाले असून त्यावर सौम्याचा फोटो दिसत आहे. ठाणे पार्कींग प्लाझा कोविड केंद्रात फ्रंटलाईन वर्कर असल्याचे भासवत कोरोना लसीकरण केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान सौम्याने तिच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. आता सर्वांनाच लसीकरण खुले करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment