लोकप्रियता घसरल्याने अमिताभ बच्चन चिंतीत

On: June 13, 2021 12:11 PM

मुंबई : चाहत्यांकडून आता पूर्वीसारखे प्रेम मिळत नसल्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रसिद्धीसाठी नेहमी सक्रीय राहणारे अमिताभ बच्चन नेहमी आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायीक आयुष्यातील अनुभव सोशल मिडीयावर ते नेहमी सादर करत असतात. नुकताच त्यांनी एक महागडा फ्लॅट घेतल्याचे त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले होते. दरम्यान त्यांचे पिताश्री कवी हरिवंशराय बच्चन (बाबुजी) यांच्या काही कविता हरवल्याबद्दल त्यांनी मनातील संताप सोशल मिडीयावर व्यक्त केला होता.

नुकत्याच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत ते एका मुलीला ऑटोग्राफ देत असून शेजारी शशी कपूर उभे आहेत. या फोटोसह त्यांनी म्हटले आहे की “गेले ते दिवस ज्यावेळी चाहते मला अशा प्रकारे प्रेम देत होते. आता केवळ इमोजी शिल्लक राहिल्या आहेत. परिवर्तन हा संसारचा नियम असल्याचे म्हटले जाते. काळानुसार एखाद्याची लोकप्रियता वाढते तर एखाद्याची कमी देखील होत असते. काळ हा सर्व शक्तीशाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment